काल मात्र नवल झाले

तो रोज ऑफीसमधून आला की वैतागलेला असायचा.

आॕफीसमध्ये साहेबांनी  ऐनवेळी सांगितलेली एक्स्ट्रा कामे, 

पेट्रोलच्या वाढत्या किमती, बेशीस्त वाहतुकीमुळे होणारी वाहनांची कोंडी,

 खड्ड्यांमुळे झालेली रस्त्यांची दूरावस्था, हे आणि ते...कितीतरी कारणांमुळे तो चिडायचा 

आणि आल्याआल्या दहा मिनीटे संताप व्यक्त करायचा. ती चहा आणेपर्यंत तो बोलायचा.



काल मात्र नवल झाले.

तो मस्तपैकी बाईकची चावी बोटात फिरवत शिट्टी वाजवत घरात शिरला.

ती त्याच्याकडे पहातच राहिली.

तो : "काय बघतेस अशी?"

"माझा नवरा एवढा आनंदी होऊन येतोय ते पहातेय. काय झाले? प्रमोशन झाले?"

तो :  "नाही गं."

" पेट्रोलचे दर कमी झाले?"

तो : " होतील असे वाटते तुला?"

"आज ट्रॕफीक जाम नव्हत?"

तो : "जास्त होते"

"रस्ते एकदम गुळगुळीत झाले रात्रीतून?"

तो : "कसे शक्य आहे?"

"मग काय झाले. आज रोजच्या समस्यांवर वैतागला नाही."

तो : "समस्या रोजच राहणार.तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात त्यावर ते अवलंबून आहे."

"अच्छा ,म्हणजे तू एखाद्या महाराजांच्या प्रवचनाला जाऊन आला असेल."

तो :  "तितका वेळ आहे का?"

"एखाद्या सायकॕट्रीस्ट कडून कौन्सलींग?"

तो : "तेवढी वेळ आलेली नाही"

" मगअशी कोणती गोष्ट घडली असेल की माझ्या नव-याने आनंदी राहायला सुरूवात केली?"

 तिच्या डोळ्यांत पहात म्हणाला


" आपण भारतात राहतो, अफगाणीस्तानमध्ये नाही " 



एवढा एक विचार जरी मनात आला तरी आपले आयुष्य  सुंदर वाटते.


व्हाट्सअप वरून साभार