टिचरने शिट्टी वाजवली तशी चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला. एकच लक्ष्य पलीकडच्या टोकाला टच करुन लवकर परत यायचं.
पहिल्या तिघांना बक्षिस. पहिल्या तीनसाठी सगळ्यांची चढाओढ. बघायला सगळ्यांचे आईबाबा म्हणुन उत्साह जरा जास्तच होता.
पावले परत फिरली. गर्दीतुन बघ्यांचे " पळ पळ" म्हणून आवाज वाढू लागले.
पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं. चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज आलेले.
काही पालकही नाराज झालेले.
आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा म्हणत चालू लागले. त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच.
५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली.
बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन तिला उचलून घेतले आणि
" वेल डन बच्चा. चल कुठले आइस्क्रिम खाणार ?. विचारले.
" पण बाबा माझा नंबर कुठे आलाय ? मुलीनं आश्चर्याने विचारलं.
" आला की. पहिला नंबर आला तुझा बेटा. "
" कसा काय बाबा. ५ वा आला ना ?" मुलगी गोंधळलेली.
" अगं, तुझ्या मागे कितीजण होते ?".
थोडीशी आकडेमोड करत ती म्हणाली ,
" ४५ जण".
" म्हणजे उरलेल्या ४५ जणात तु पहिली आलीस. म्हणून तुला आइस्क्रिम."
" आणि पुढचे चार जण ?". गोंधळ वाढला तिचा.
" त्यांच्याशी आपली शर्यत नव्हती यावेळी".
"का ?".
" कारण त्यांनी जास्त तयारी केलेली. आता आपण
परत चांगली तयारी करायची. मग पुढल्यावेळी तु
४८ जणात पहिली येणार. त्यानंतर ५० जणात."
" असं असतंय बाबा ?".
" होय बेटा असंच असतंय ".
"मग पुढल्यावेळी शेवटी एकदम मोठी उडी मारुन पहिली येते की ?. आता मुलीला उत्साह आलेला.
" एवढी घाई कशाला बेटा ? पाय मजबूत होऊदेत की. आणि आपण आपल्यापुढे जायचं. दुस-यांच्या नाही".
तिला फार काही समजलं नाही पण विश्वासानं म्हणाली, " तुम्ही म्हणाल तसं ".
" आता आइस्क्रिम सांगा की हो ". बाबा.
मग मात्र नवीन आनंद गवसावा तशी, मुलगी ४५ जणात पहिली आल्याच्या आनंदात बाबाच्या खाद्यावर हसत मान ठेऊन जोरात ओरडली,
" मला बटरस्कॉच आइस्क्रिम पाहिजे".
Sourse WhatsApp